प्रकार : गिरिदुर्ग
उंची : 1100 मी / 3500 फूट
जिल्हा : पुणे
तालूका : जुन्नर
उपनाम : -
श्रेणी : सोपी
छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या किल्लावर झाला तो किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी. या किल्ल्यावर राज्यांचा जन्म झाल्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
इतिहास
इ.स. 1170 ते 1308 च्या काळात यादवांनी येथे आपले राज्य निर्माण केले त्यांनीच या किल्ल्याची निर्मिती केली. इ. स. 1443 मध्ये मलिक –उल-तुजार याने यादवांचा पराभव करून हा किल्ला हस्तगत केला. त्यानंतर या किल्ल्यावर निजामशाहीचे राज्य आले. 1595 च्या काळात हा किल्ला भोसले राज्यांकडे आला. फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जिजाऊंच्या पोटी शिवाजी राजे जन्माला आले. या गडावर शिवाई नावाजी देवी होती तिला जिजामातेने नवस बोलला होता त्यामुळे मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.
इ. स. 1637 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. शिवाजीने हा किल्ला परत मिळवण्यासाठी दोन तीन वेळा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी 1716 मध्ये शाहूमहाराजांनी हा किल्ला मराठांच्या ताब्यात आणला.
पाहण्यासारखी ठिकाणे :
गंगा टाकी, जमुना टाकी, शिवाई मंदीर, दरवाजे, अंबरखाना, शिवजन्मस्थान, जिजाऊ व बाल शिवाजी यांचा पुतळा, बदामी टाक इ पाहण्यासारखे आहे.
राहण्याची सोय :
शिवकुंजच्या मागिल बाजूस वर्हांड्यात 10 ते 15 जणांची सोय होऊ शकते.
पाण्याची सोय :
गंगा जमुना टाक्यांमध्ये 12 माही पिण्याचे पाणी उपलब्ध
जेवणाची सोय :
आपण स्वत: करावी
जाण्याच्या वाटा :
गडाच्या वरपर्यंत गाडी जाते. तसेच सातवाहनकालीन खोदीव दगडी पायर्यांचा मार्ग आहे. साखळीच्या मार्गे सुध्दा रस्ता आहे.
No comments:
Post a Comment