प्रकार : गिरिदुर्ग
उंची : 1025 मी / 3200 फूट
जिल्हा : पुणे
तालूका : जुन्नर
उपनाम : - पर्वतगड
श्रेणी : मध्यम
जुन्नरच्या नाणेघाटच्या डोंगरात वसलेल्या दुर्ग चौकडीतील हडसर हा एक किल्ला. पर्वतगड म्हणूनही हा किल्ला ओळखला जातो. या भागातील शिवनेरी हा किल्ला सर्व परिचित आहे मात्र हडसर, चावंड, जीवधन हे मात्र अनेक जणांना माहित नाहीत. जुन्नरपासून 10 ते 12 कि. मी. वर हा किल्ला आहे.
इतिहास :
सातवाहनकाळात या गडाची निर्मिती झाली आहे. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नरगच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला होता. या किल्ल्याचा इतिहासात फारसा उल्लेख नाही. शहाजीराज्यांनी मोगलांनी केलेल्या तहात जे किल्ले गेले त्यात या किल्ल्याचा समावेश होता.
1818 च्या काळात इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. या किल्ल्यापासून पुढे धोका निर्माण होऊ नये म्हणून इंग्रजांनी या किल्ल्यावर जाणार्या वाटा सुरूंग लावून फोडल्या होत्या. आता मात्र या किल्यावर सहज जाता येते.
पाहण्यासारखी ठिकाणे :
किल्ल्यावर जाण्यासाठी 300 पायर्या आहेत. या किल्याचे प्रवेशद्वार म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. त्यामुळे जे दुर्गवेडे आहेत त्यानी हा किल्ला पाहिलाच पाहिजे. कोरीव गुहा महादेवाचे मंदिर, तीन प्रशस्त कोठारे
राहण्याची सोय :
नाही, हडसर गावात मात्र होऊ शकते.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर 12 महिने पिण्याचे पाणी उपलब्ध.
जेवणाची सोय :
नाही, हडसर गावात मात्र होऊ शकते.
जाण्याच्या वाटा :
पुण्याहून जुन्नरला राज्य परिवहन मंडळाची बस जाते. तेथून हडसरपर्यंत जीपने जाता येते हडसरहुन किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्या आहेत.
No comments:
Post a Comment