महाराष्ट्राचे खरे वैभव म्हणजे सह्यादीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेले किल्ले. या किल्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली. हे दुर्गम व सागरी किल्लेच शिवरायांची खरी सेना होती. या किल्यांमुळे शिवाजीराज्यांनी चारही पातशाह्यांना झूंजवले.
महाराष्ट्रात आजमितीला 350 हून अधिक किल्ले आहेत. पण या समृध्द वैभवाकडे आपल्या सर्वांचेच दूर्लक्ष झाले आहे. इतिहासात एवढी महत्वाची भूमिका बजावणार्या या किल्यांवर आज फक्त पूरातत्व विभागाच्या एका निळ्यापाटी शिवाय काहीच नाही. अनेक किल्ले ढासळत चालले आहेत. अशीच परिस्थिती राहीली तर काही वर्षांनंतर तेथे या किल्यांचे अस्तित्वच राहणार नाही. पुढच्या पिढीला फक्त किल्यांच्या फोटोवर समाधान मानावे लागेल. काही मोजके किल्ले सोडले तर कित्येक किल्ले लोकांना माहितसूध्दा नाहीत हे आज आपले सर्वांत मोठे दुर्दव आहे.
आज किल्यांच्या बाबतीत माहिती गोळा करायची तर फार थोडया किल्यांबद्दल त्रोटक माहिती इंटरनेवर उपलब्ध आहे. यातूनच आम्हाला किल्यांवर एकादे स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करण्याची संकल्पना मनात आली. यात शक्य होईत तेवढ्या किल्यांची माहिती व छायाचित्रे देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. प्रत्येक किल्याचा इतिहास, त्यावर असलेली ऐतिहासीक स्थळे, त्या किल्यावर जायचे कसे, तेथे राहण्याची, जेवणाची सोय आहे की नाही, अशी सर्व प्रकारची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
आमच्या या छोट्याश्या प्रयत्नातून जर कोणाच्या मनात किल्यांविषयी जनजागृती निर्माण झाली तर हे या संकेतस्थळाचे सर्वात मोठे यश असेल आपल्याला या संकेतस्थळाबद्दल काही प्रतिक्रीया वा सूचना असल्यास आम्हाला जरूर कळवा आम्ही त्याची वाट पहात आहोत.
2 comments:
Nice
Mi he majya project madhe lihile ahe
Nice
Post a Comment