प्रकार : गिरिदुर्ग
उंची : 1090 मी / 3412 फूट
जिल्हा : पुणे
तालूका : मावळ
उपनाम : -
श्रेणी : सोपी
किल्ले लोहगड नावाप्रमाणे अतिशय मजबूत बुलंद व पोलादी गड आहे. मावळ व लोणावळ्यातील भागातील संरक्षण करण्यासाठी लोहगड व विसापूर बांधण्यात आला होता. लोणावण्यापासून जवळ असल्यामुळे तसेच भाजे व बेडसे लेणी असल्यामुळे येथे दुर्गप्रेमींची वर्दळ असते.
इतिहास :
या किल्ल्याचा इतिहास तसा 2500 वर्षांपूर्वीचा आहे. सातवाहन चालुक्य, राष्ट्रकूट यादव अशा सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या आहेत. इ. स. 1490 च्या काळात निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने पुण्याच्या आजूबाजूचे अनेक किल्ले जिंकले त्यात या ही किल्ल्याचा समावेश आहे. इ.स.1635 मध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला. इ. स. 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. पुढे 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला व त्यात जे काही 23 किल्ले मोगलांना गेले त्यात याही किल्ल्याचा समावेश होता. पण पाचच वर्षांनी म्हणजे 1670 च्या काळात मराठ्यांनी या किल्ल्यावर भगवा फडकवला. पहिल्या सुरत लुटीतील सर्व धन प्रतिशिवाजी नेताजी पालकर यांनी याच किल्ल्यावर आणून ठेवली होती. शिवाजी महाराज्यांच्या मृत्यू नंतर हा किल्ला परत मोगलांकडे गेला. मात्र कान्होजी आंग्रे यांनी 1713 मध्ये हा किल्लावर मराठ्यांचे छत्र आणले. इ.स. 1720 मध्ये तो पेशव्यांकडे आला. 1770 मध्ये नाना फडणवीसांचे सरदार जावजी बोंबले यांच्या ताब्यात आला. 1803 मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला. पर लगेत दुसर्या बाजीराव पेशव्याने तो किल्ला जिंकला. पण पुढे 1818 मध्ये हा किल्ला जिंकण्यासाठी जनरल प्रॉथर आला त्याने प्रथम विसापूर जिंकला व त्याच्या दुसर्याच दिवशी लोहगड पडला.
पाहण्यासारखी ठिकाणे :
गडावर चढताना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. त्या मार्गाने गेल्यावर गणेश दरवाजा नारायण दरवाजा हनुमान दरवाजा व महादरवाजा लागतात. नारायण दरवाज्यापाशी दोन भूयार आहेत तेथे पुर्वी भात व नाचणी साठवले जात होती. गडावर दोन तोफाही आहेत. शिवमंदिर भग्नावस्थेत आहे.
राहण्याची सोय :
या गडावर राहण्याची सोय होऊ शकते.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर 12 महिने पिण्याचे पाण्याची मुबलक सोय.
जेवणाची सोय :
नाही
जाण्याच्या वाटा :
पुण्याहुन लोणावळ्याकडे जाणार्या लोकलमध्ये बसल्यावर लोणावळ्याच्या आधी मळवली हे रेल्वे स्थानक आहे. येथे उतरून लोहगडवाडीला जाता येते. तेथून किल्यावर जायला वाट आहे. वाटेत भाजे काले व बेडसाची लेणी पाहण्यासारखी आहेत.
No comments:
Post a Comment