प्रकार : गिरिदुर्ग
उंची : 1045 मी / 3700 फूट
जिल्हा : पुणे
तालूका : जुन्नर
उपनाम : -
श्रेणी : कठीण
जुन्नरच्या नाणेघाटच्या डोंगरात वसलेल्या दुर्ग चौकडीतील जीवधन हा एक किल्ला. या भागातील शिवनेरी हा किल्ला सर्व परिचित आहे मात्र जीवधन, हडसर, चावंड हे मात्र अनेक जणांना माहित नाहीत. जुन्नरच्या पश्चिमेला 30 ते 32 कि. मी. वर हा किल्ला आहे.
इतिहास :
सातवाहनकाळात या गडाची निर्मिती झाली आहे. नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती केली होती. इ.स. 1485 च्या काळात अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने हा किल्ला जिंकून घेतला होता.
इ. स. 1664 च्या सुमारास निजामशाहीचा शेवटचा वंशज मूतिजा निजाम याला जीवधनच्या किल्ल्यावर कैद केले होते. शहाजीराज्यांनी या किल्ल्यावर आक्रमण करून त्याला या कैदेतून मुक्त केले.
1818 च्या काळात इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
पाहण्यासारखी ठिकाणे :
गजलक्ष्मीचे शिल्प, पाण्याचे टाके, जीवाईदेवीचे मंदिर, धांन्याची कोठार इ. प्रेक्षणीय आहे. या किल्ल्यावरून कोकणाचे विहंगम दृष्य दिसते.
राहण्याची सोय :
नाही
पाण्याची सोय :
किल्ल्यावर 12 महिने पिण्याचे पाणी उपलब्ध.
जेवणाची सोय :
नाही,
जाण्याच्या वाटा :
पुण्याहून जुन्नरला राज्य परिवहन मंडळाची बस जाते. घाटघर मार्गापर्यंत जीपने जाता येते. तेथून पायवाटेने किल्ल्यावर जाता येते. गडावर जाण्यासाठी पूर्वेकडून व पश्चिमेकडून असे दोन मार्ग आहेत.
No comments:
Post a Comment